भारतीय मसाल्यांना अनेक वर्षांचा प्राचीन इतिहास आहे. रामायणासारख्या प्राचीन भारतीय महाकाव्यांमध्ये लवंगेचा उल्लेख आढळतो. इंडोनेशियन व्यापारी आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याभोवती मसाल्यांचा व्यापार करण्यासाठी , भारत, मध्य पूर्व येथे गेले. अरब व्यापाऱ्यांनी मध्य पूर्व आणि भारत यांच्यातील सुलभ मार्गांची सोय केली. इजिप्शियन शहर अलेक्झांड्रिया हे त्याच्या बंदरामुळे मसाल्यांचे मुख्य व्यापारी केंद्र बनले.
पूर्वेकडील मसाला उत्पादकांकडून पश्चिम युरोपीय ग्राहकांपर्यंत पोहचल्याने हळूहळू मसाल्यांच्या व्यापाराची पद्धत जमिनीच्या मार्गाने बदलून सागरी मार्गाने झाली. युरोपियन व्यापाऱ्यांनी जलमार्गाने मसाल्यांचा व्यापार सुलभ केला.
औषधी वनस्पती आणि मसाले यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले नसते तर नवलच. ॲसिरियन आणि बॅबिलोनियन्सपासून ते अरबी, रोमन, इजिप्शियन, चिनी, ब्रिटीश आणि पोर्तुगीजांपर्यंत सर्वांनी एकाच उद्देशाने भारतावर आक्रमण केले: विपुल नैसर्गिक संसाधने आणि मसाल्यांच्या उत्पत्तीपासून फायदा मिळवण्यासाठी.
ऋग्वेद (सुमारे ६००० इ.स.पू.) आणि यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ह्यामध्ये भारतातील मसाल्यांची पहिली लेखी नोंद आढळते. वैदिक काळात सर्व माहिती मुख्यतः स्तोत्रांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या तोंडी दिली जात असे. ऋग्वेदात अनेक मसाल्यांचा उल्लेख आहे आणि यजुर्वेदातही काळ्या मिरीचा उल्लेख आहे.
चीन, इंडोनेशिया, भारत आणि सिलोन (आता श्रीलंका) येथील मसाले पूर्वी गाढव आणि उंटांच्या ताफ्यातून ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात होते. युरोपियन लोकांना भारताकडे जाण्याचा सागरी मार्ग सापडेपर्यंत सुमारे ५००० वर्षे मसाल्यांच्या व्यापारावर अरबांचे वर्चस्व होते.
मसाले मिळवण्याची अधिक किफायतशीर पद्धत शोधण्यासाठी अनेक सागरी प्रवास करण्यात आले. फर्डिनांड मॅगेलन, वास्को दा गामा आणि क्रिस्टोफर कोलंबस हे त्यापैकीच काही. १४९७ मध्ये आफ्रिकेतून प्रवास केल्यानंतर पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याला १४९८ मध्ये भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवर कोझिकोड सापडले. तो जायफळ, लवंगा, दालचिनी, आले आणि मिरपूड घेऊन परतला. मसाल्यांच्या व्यापाराचे केंद्र असलेल्या भारताच्या मलबार कोस्टवर त्याचे आगमन होताच युरोप आणि दक्षिण पूर्व आशिया यांच्यात थेट व्यापार सुरू झाला.
सर्वात जुनी मसाले पिके दालचिनी आणि काळी मिरी होती; हे अरबी आणि रोमन लोकांसह आणि अखेरीस, जगातील सर्वात मौल्यवान वस्तूंपैकी असंख्य व्यापार संबंधांचा आधार बनले. १३०० च्या दशकात युरोपमध्ये एक पौंड जायफळ सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान होते. अल्पावधीतच पोर्तुगीजांनी किनारपट्टीवरील मसाले उत्पादक प्रदेशावर ताबा मिळवला, आणि भारतीय मसाल्यांच्या व्यापारावर जवळपास एकाधिकार प्रस्थापित केला जो एक शतकाहून अधिक काळ टिकला आणि पोर्तुगीज साम्राज्यासाठी विलक्षण फायदेशीर ठरला.
पूर्वीच्या काळात पाश्चिमात्य देशांमध्ये स्वादासाठी काळीमिरी व मीठ याचाच वापर होत असे. सुरवातीच्या काळात दळणवळणाची सुविधा अगदी नगण्य असल्याने अतिशय कमी प्रमाणात भारतातून निर्यात होत असे. त्यामुळे जगातील अरब व्यापाऱ्यांनी सिल्क रोडची स्थापना करून मोठया प्रमाणावर दळणवळण वाढवण्याचा प्रयत्न्य केला. परंतु मसाले व्यापारामध्ये फारसा फरक पडू शकला नाही.
सिल्करोड म्हणजेच पूर्वीच्या काळातील जागतिक व्यापारासाठी वापरला जाणारा प्रमुख रस्ता होय. हा रस्ता नाईल नदीच्या काठाने जंगलातून बनवला गेला. याचे कारण प्रवासामध्ये व्यापाऱ्यांना व त्यांच्या सोबत असणाऱ्या उंट व इतर प्राण्यांना पाण्याची सहज सोय व्हावी. त्या काळात उंट व इतर प्राण्यांच्या साह्याने मसाल्याच्या पदार्थांचे दळणवळण होत असे, यामुळे वाहतुकीस खूप वेळ लागत असे व अपेक्षित प्रमाणात मसाले पदार्थांची निर्यात होत नसे. याच कालावधी मध्ये तो रस्ता इतका प्रसिद्ध झाला होता कि मंगोलियन लुटेरे व्यापाऱ्यांना वेळोवेळी लुटू लागले व पुढे ऑट्टोमन एम्पायर, अब्दुलकि एम्पायर, जफर एम्पायर हे मुस्लिम प्रांत यांनीही ठिकठिकाणी कर आकाराणे चालू केले. त्यामुळे मसाले पदार्थांची किंमत खूप वाढत होती, आणि मसाले पदार्थांचा वापर जगातील श्रीमंत लोकांमध्ये अधिक होऊ लागला.
मसाला व्यापाराचे दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढावे यासाठी पोर्तुगाल व स्पेन व्यापाऱ्यांनी सागरी जहाजांची निर्मिती करून दळणवळणासाठी सागरी मार्ग शोधला. या मार्गाला त्या काळात वास्को द गामा मार्ग व नंतर कोलंबस मार्ग असे संबोधले जायचे. या सागरी मार्गांमुळे जलद मसाले व्यापार, परवडणारी किंमत व खूप मोठया प्रमाणामध्ये मसाले पदार्थांची निर्यात होऊ लागली त्यामुळे जगातील सर्व सामान्य लोकांपर्यंत परवडणाऱ्या किंमतीमध्ये भारतातील मसाले पोहचू लागले व जगातील श्रीमंत कुटुंबासह सर्वसामान्य कुटुंबामध्ये भारतीय मसाल्यांचा अप्रतिम स्वाद दरवळू लागला.
पुढे तर पोर्तुगीजांनी मसाले निर्यातीसाठी गोवा प्रांत ताब्यात घेऊन तिथे समुद्रामध्ये बंदराची उभारणी केली, व भारतातून जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मसाल्याची निर्यात चालू केली. परंतु काही देशांमधील व्यापारी पोर्तुगीजांमार्फत मसाले व्यापारासाठी तयार होत नव्हते म्हणून पोर्तुगीजांनी १५१० ते १५११ या काळात निर्याती व्यापाराची नियमावली बनवली व मसाला निर्यातीचा व्यापार करू लागले. त्या नंतर मलय द्विपकल्प प्रांतातील मलाक्काची व मोर्तुगील बंदरे मसाले व्यापारासाठी उभारली व पोर्तुगीजांनी चीन व सियाम प्रांतातील व्यापाऱ्यांशी संधान बांधून इतरत्र देशांमध्ये मसाले व्यापार वाढवला.
याच काळात युनायटेड किंग्डम व यूरोप मधील व्यापाऱ्यांना अरब लोकांकडून मसाले व मसाले पदार्थाविषयी समजलं तेव्हा त्यांनी मसाले या विषयावर आणखी माहिती मिळवण्यास सुरवात केली. बियाणे, फळे, मुळे, साली, फुले व इतर वनस्पती पदार्थ यांचे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते व यांचा भाज्यांमध्ये रंग व स्वाद येण्यासाठी वापर होतो हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी भारतातून युनायटेड किंग्डम व यूरोप भागात मसाल्यांच्या व्यापारासाठी भारतातून मसाले पदार्थ आयात करण्यासाठी आणखी जलद गतीचा सागरी मार्ग शोधण्यास सुरवात केली व पोर्तुगीजांमार्फत युनायटेड किंग्डम व यूरोप सह पूर्ण जगामध्ये मसाल्याचा व्यापार मोठया प्रमाणावर सुरु झाला.
पोर्तुगीजांनंतर ब्रिटिशांनी भारतामधून मसाले निर्यातीचा व्यापार अंदाजे इ. स. १६०० च्या आसपास पर्यंत केला. त्याबदल्यात ब्रिटिश पोर्तुगीजांना करारानुसार कर देत होते. नंतर हिंदुराजवटीची स्थापना होऊ लागली व भारतीय व्यापाऱ्याची संख्या वाढू लागली. तेव्हापासून ते आजपर्यंत भारताचा मसाले उत्पादन व निर्यातीमध्ये जगातील सर्वात मोठा म्हणजेच ७५% वाटा आहे याचा मसाले उत्पादक व विक्रेते म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.
भारतीय मसाले हा व्यक्तिगत संपत्ती आणि सामाजिक स्थिती प्रस्थापित करण्याचा एक मार्ग बनला.
भारतीय मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत आणि म्हणूनच ते आरोग्यासाठी चांगले आहेत. याव्यतिरिक्त, मसाले हे पाचक म्हणून ओळखले जातात आणि जगभरातील पाककलांमध्ये आवश्यक मानले जातात. त्यापैकी काहींमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, तर काहींमध्ये संरक्षक गुणधर्म असतात आणि ते लोणचे आणि चटण्या इत्यादी विशिष्ट पदार्थांमध्ये वापरले जातात.
आम्ही भारतातील सर्वात जुन्या म्हणजेच ३००० वर्षांपेक्षा जास्त चालत आलेल्या मसाले व्यापार उत्पादनात तंत्रज्ञानासह गुणवत्ता तपासणी करून जवळपास २५ वर्षाहून अधिक काळ शेफ अनुभवासह पारंपरिक व हॅन्डमेड डंकावर कुटून प्रमाणीकरण तंत्र वापरून महाराष्ट्र व देशातील वेगवेगळ्या चवीमध्ये उत्तम दर्जाचे मसाले बनवतो.
उत्कृष्ट दर्जाचे हॅन्डमेड मसाले बनविण्यासाठी आम्ही संबंधीत क्षेत्रातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांकडून उत्कृष्ट दर्जाचा कच्चा माल आणि खडा मसाला खरेदी करतो ज्यामुळे आमच्या मसाल्याची ताकद आणि स्वाद वर्षांनुवर्षे जसाचा तसा रहातो.
विशेषतः महिलांचे सक्षमीकरण तसेच त्यांना उदरनिर्वाहाचे एक सशक्त साधन मिळवून देण्यात हँडमेड मसाले या ब्रँडचा खारीचा वाटा आहे याचा आम्हाला अभिमान आहे. मसाले बनवावे तर स्त्रीनेच, कारण तिच्या मायेचा ओलावा आणि हाताची चव; दोन्हीला पर्याय नाही. आम्ही अधिकाधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देतो.
पुढच्या वेळी चटकदार आणि हाती बनवलेले अस्सल मराठमोळ्या चवीचे मसाले हवे असतील तर हँडमेड मसाले ब्रँडची आवर्जून मागणी करा.