सौ. विजया सोळसकर ह्या हँडमेड मसालेमागील प्रेरणा आहेत. महिलांना अधिक स्वावलंबी बनवून त्यांना समाजाच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलण्यासाठी सशक्त करणे हे त्यांचे स्वप्न आहे. घरातील कर्ती स्त्री ज्या मूल्यांना जीवापाड जपते, तीच मूल्य जोपासत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. महिलांच्या कौशल्याचा वापर करून त्यांनी हँडमेड मसाले उत्पादनांची एक अनोखी श्रेणी तयार केली. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आमची वाटचाल सुरू आहे.
श्री. विशाल सोळकरांना खाद्य पदार्थ क्षेत्राचा अनेक
वर्षांचा अनुभव आहे.
ते हँडमेड मसाले उत्पादनांची विक्री
आणि विपणनाचे व्यवस्थापन करून आपला कौटुंबिक वारसा
पुढे नेत आहेत. विपणनाचे जाळे विस्तारित करून हँडमेड
मा सर्वत उपलब्ध करण्यात त्याचे मोलाचे
योगदान आहे.
त्यांच्याकडे समर्पित लोकांची एक मोठी टीम आहे जी असंख्य
ग्राहकांना
त्यांची सेवा देण्यासाठी २४ व ७ काम करत असते.
सौ. स्मिता सोळसकर ह्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल सदैव सतर्क
असतात आणि
हँडमेड मसाले यांचे उत्पादन आणि प्रक्रिया
विभाग संभाळतात. शेतकऱ्यांकडून उत्तम दर्जाचा
कच्चा माल
लरेदी करणे आणि गुणवत्ता नियंत्रण ठेवणे हे त्यांचे वैशिष्ट्य
आहे. वेळेवर
उत्पादन, पॅकिंग आणि डिलिव्हरी रेडी उत्पादने
तयार करणे ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा
मोलाचा वाटा आहे.
श्री. अमोल यादव ह्यांना स्टोअर मॅनेजमेंट आणि वितरण
नियोजनाचा प्रदीर्घ
अनुभव आहे. शेतकरी, व्यापारी ह्यांच्याशी
व्यावसायिक संबंध बळकट करून त्यांनी हॅण्डमेड
मसाले साठी
लागणाऱ्या मालासाठी एक चांगली कार्यपद्धती अवलंबली आहे.
ते खरेदी विभागाचे
व्यवस्थापन आणि उत्पादनांच्या श्रेणीचे
वितरण नियोजन करण्यात निपुण आहेत.
सौ. स्वाती यादव ह्या हॅण्डमेड मसाले मध्ये लेखा विभागात
आर्थिक नियोजनाचे काम बघतात. दैनंदिन आर्थिक नियोजन,
टॅक्सेशन, जमा-खर्च ह्यासर्व गोष्टीवर त्यांचे प्रभुत्व आहे. प्रत्येक
रुपया विशिष्ट हेतूसाठी खर्च केला जाईल याची त्या खात्री करून
काम करतात.