लोणचे हे भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारतामध्ये अतिशय प्राचीन काळापासून लोणची बनविण्याची पद्धत होती. तसेच त्या काळी फळे व भाज्यांचा हंगाम आणि ऋतू पाहून त्या त्या वेळी जे पदार्थ उपलब्ध असतील ते पदार्थ व त्यांच्याबरोबर इतर मसाले आणि तेले योग्य प्रमाणामध्ये वापरून, वर्षभर टिकून राहणारी लोणची बनविली जात असत. खाद्यपरंपरा कोणत्याही राज्याची असो, त्यामध्ये लोणच्याचा समावेश असतोच. जेवणाच्या ताटामध्ये अनेक पदार्थ असले, तरी एका लोणच्याच्या फोडीने भोजनाचा स्वादच बदलून जातो.
लोणच्याला इंग्रजी भाषेमध्ये 'पिकल' म्हटले जाते. हा शब्द आणि पदार्थ पाश्चात्य देशांमध्ये चौदाव्या शतकामध्ये अस्तित्वात आला. हा पदार्थ बनविण्यासाठी भाज्या आणि फळे ह्यांचा वापर होऊ लागला. जसजसा काळ बदलला, तसतशी आपली खाद्य संस्कृतीही बदलली हे जरी खरे असले, तरी लोणचे आजही आपल्या खाद्यसंस्कृतीचा महत्वाचा भाग आहे, हे ही तितकेच खरे आहे.
लोणचे जेवणाची रुची वाढवितेच, पण त्यामुळे आपल्या शरीराला पौष्टिक तत्वे देखील मिळतात. आंबा, लिंबे, आवळे इथपासून ते मुळा, गाजर, फ्लॉवर, कारली, इथपर्यंत कोणत्याही फळे, किंवा भाज्यांची लोणची घालता येतात. काही लोणची कमी काळ टिकणारी, तर काही वर्षभरदेखील उत्तम टिकणारी असतात.
ख्रिस्तपूर्व २०३० सालामध्ये मेसोपोटेमियामधील रहिवासी काकडीचे लोणचे खात असल्याचा उल्लेख अनेक प्राचीन ऐतिहासिक लेखांमध्ये सापडतो. त्याकाळी उत्तर भारतातील लोक काकडीचे बियाणे घेऊन टिगरिस व्हॅली मध्ये गेले आणि अश्या रीतीने तिथे काकडीची पैदास सुरु झाली असे म्हणतात.
प्राचीन आयुर्वेदात लोणचे बनविण्याची रीत नमूद केलेली असून या पद्धतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. पाचक, रेचक म्हणून तर लोणच्याचा उपयोग आहेच. मोरावळा आणि च्यवनप्राश ही देखील एका विशिष्ट प्रकारची औषधी लोणचीच आहेत आणि आरोग्यासाठी हितकारकही आहेत. लोणचे खाल्ल्यावर तोंडात जी लाळ सुटते ती पचनास सहाय्यक करते.
जिप्शियन सौंदर्यवती क्लियोपात्रा हिला काकडीचे लोणचे अतिशय प्रिय असून, सुप्रसिद्ध दार्शनिक अरास्तु यांनीही आपल्या लिखाणामध्ये काकडीच्या लोणच्याचे वर्णन आणि त्याच्या सेवनाने आरोग्याला होत असणाऱ्या लाभांचा उल्लेख केला आहे. संपूर्ण आशिया खंडामध्ये लोणचे हा पदार्थ जवळजवळ प्रत्येक देशाच्या, प्रांताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये समाविष्ट आहे. कोरिया देशामध्ये तर लोणच्याचा इतिहास हजार वर्षांचा आहे. कोरियामध्ये लोणच्याची परंपरा आली ती चीनमधून. परंपरा चीनी असली, तरी कोरियावासियांनी तिचा स्वीकार करून आपल्या खाद्यसंस्कृतीनुसार त्यामध्ये बदल घडविले.
सोळाव्या शतकामध्ये युरोपमध्येही अनेक पदार्थांवर प्रक्रिया करून ते टिकवून ठेवण्याची पद्धत सुरु झाली. परिणामी टोमॅटो केचप, निरनिराळे जॅम, जेली आणि मुरंबे चलनात आले. तसेच भाज्या आणि फळे ह्याची लोणची बनविली जाऊ लागली. लोणचे रोजच्या जेवणातील असो, किंवा खास निमित्ताने बनविले गेलेले कुठल्या विशेष भाजी किंवा फळाचे असो, हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आणि भोजनाची रुची वाढविणारा आहे यात शंका नाही.
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्याने आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे फळे, फुले, कंदमुळे, व भाजीपाला मुबलक उपलब्ध असल्याने याचा आपल्या देशातील फळ प्रक्रिया उद्योग निर्याती व्यापार व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. लोणच्याचा शोध कोणत्या व्यक्तीने लावला याचा कुठेही उल्लेख आढळत नाही, परंतु लोणचं बनवण्याचा शोध त्या पूर्वीच्या काळातील युनायटेड भारतातील टायग्रीस खोऱ्यामध्ये लागला असा इतिहासामध्ये उल्लेख आहे.
लोणचं काकडीच बनवलं गेलं व त्यानंतर अशा अनेक फळभाज्या जास्त काळ टिकवण्यासाठी याच प्रक्रियाच वापर होऊ लागला. तेव्हापासून सिल्क रोड वरून प्रवास करणाऱ्या व सागरी मार्गाने होणाऱ्या जागतिक व्यापाऱ्यांमध्ये व अनेक युद्धांमध्ये लोणच्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला.
वेगवेगळ्या देशामध्ये लोणच्याला वेगवेगळ्या नांवाने संभोधले जाते.
१) भारत - आचार, २) दक्षिण कोरिया - किमची, ३) जर्मनी सौरक्रांत, ४) फिनलैंड - हेरींग, ५) - मोरोक्को लहमद मकिड, ६) जपान • कीयारी झुके, ७) इस्त्रायल तौरशी, ८) स्वीडन - - पिकल्ड हेरींग, ९) फ्रांस कॉर्नी कॉर्न
पारंपरिक व हाताने बनवलेल्या लोणच्याची चव चांगली असते व त्यामध्ये अनेक खनिजे असतात. प्रवास करताना ते उपयुक्त असते, कारण त्यामध्ये पचनासाठी मदत करणारे नैसर्गिक संरक्षक घटक असतात. जीवनसत्व के ई चा लोणचे हा उत्कृष्ट स्तोत्र आहे ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत होते, रक्तदाब व हृदय गती नियंत्रित करण्यासाठी याची मदत होते. यामध्ये लोह, तांबे व कॅल्शियम देखील असते म्हणून ज्यू समाजाने या पदार्थाचे महत्व ओळखून लोणचं या पदार्थाचा पूर्ण जगभरात खूप मोठ्या प्रमाणावर व्यापार केला.
इ. स. १५९४ मध्ये लिंगपुराना या कन्नड ग्रंथामध्ये ५० प्रकारच्या लोणच्याचे वर्णन केलेले आहे. मनोसोला, सुपाशास्त्र, पाकदर्पण या ग्रंथात व शास्त्रात लोणच्याचा उल्लेख येतो. पाश्चिमात्य देशातील बायबल आणि इतर ग्रंथात लोणच्याचा उल्लेख आढळतो.
या सर्वापेक्षा महत्वाचे म्हणजे हरियाणा मधील पानिपतच्या तिसऱ्या युद्धामधील मराठांच्या इतिहास लोणच्याच्या खूप मोठा उल्लेख आहे. त्यावेळी युद्धकाळात सर्वप्रथम एकमेकांचा धान्यसाठा उद्धवस्त केला जात असे. भाकरी खाऊन अर्धपोटी लढाई करावी लागल्यामुळे पानिपतच्या युद्धानंतर काही मराठे वाचले त्यांना आजही गुज्जर मराठा या नावाने पानिपतमध्ये ओळखले जाते. तेव्हापासून आजपर्यंत पानिपतमधील गुज्जर मराठा समाज उदारनिर्वाहासाठी लोणच्याचा व्यवसाय करू लागला. त्यामध्ये प्रामुख्याने पंचरंगी लोणचं, सप्तरंगी लोणचं, कैरी (आंब्याचे) लोणचं, मिरची लोणचं व लिंबाचं लोणचं प्रसिद्ध झालं.
भारतातून जगामध्ये लोणची निर्यातीचा व्यवसाय खूप मोठयाप्रमाणावर वाढलेला दिसतो याचा आम्हांला भारतीय म्हणून व पारंपरिक हॅन्डमेड लोणची उत्पादक व विक्रेते म्हणून सार्थ अभिमान वाटतो.
आम्ही भारतातील सर्वात जुन्या म्हणजेच हजारो वर्षांपूर्वीपासून भारतीय बाजारपेठेसह जगातील जेवणाची रंगत वाढवणारी तंत्रशुद्ध पद्धतीने आणि केमिकल विरहित हॅन्डमेड पद्धतीने तब्बल ४० प्रकारची लोणची बनवतो.
जवळपास २५ वर्षाहून अधिक काळ शेफ अनुभवासह पारंपरिक व हॅन्डमेड तंत्र वापरून महाराष्ट्र व देशातील वेगवेगळ्या चवीमध्ये आम्ही उत्तम दर्जाची लोणची बनवतो.
उत्कृष्ट दर्जाची हॅन्डमेड लोणची बनविण्यासाठी आम्ही संबंधीत क्षेत्रातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांकडून उत्कृष्ट दर्जाचा कच्चा माल खरेदी करतो ज्यामुळे आमच्या लोणच्याची चव आणि स्वाद वर्षांनुवर्षे जसाचा तसा रहातो.
विशेषतः महिलांचे सक्षमीकरण तसेच त्यांना उदरनिर्वाहाचे एक सशक्त साधन मिळवून देण्यात हँडमेड मसाले या ब्रँडचा खारीचा वाटा आहे याचा आम्हाला अभिमान आहे. लोणची बनवावी तर स्त्रीनेच, कारण तिच्या मायेचा ओलावा आणि हाताची चव; दोन्हीला पर्याय नाही. आम्ही अधिकाधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देतो.
पुढच्या वेळी चटकदार आणि हाती बनवलेली अस्सल मराठमोळ्या चवीची लोणची हवी असतील तर हँडमेड मसाले ब्रँडची आवर्जून मागणी करा.